Posts

ती आणि मी

ति पुढे मी मागे... ति बोले मी ऐके. तिने मला झापायच ठरवायचं आणि नेमकं त्याच दिवशी मी late lab entry मारायचं. तिने मला रागाने बघायचं, मी तिला गरीब गाई सारख बघायचं. तिने मला लई ऐकवायच, मी मनात त्याच्या double हसायचं. तिने मला टोमणा मारायचं, मी कौतुक समजून ते गिळून टाकायचं. तिने माझ्या कडे बघायचं, आणि तेव्हाच मी नेमकी बोलत असायचं. तिने म्हणायचं Now face the consequences आणि मी Face करतच वर्ष काढायचं.                                    माझी आवडती शिक्षिका                          Mrs Gandra.

काहीतरी....

का मी पडू नये याच्या प्रेमात, ज्याने घेतलय मला त्याच्या विश्वासात, क्षणाक्षणाला साथ आहे मला तुझी, वाटत नाही आता भीती मला कोणाची, प्रेमाला सुरुवात असावी पण अंत नको, प्रेमात प्रामाणिकपणा असावा खंत नको, असावे नेहमी हसरे नसावे कधी दुःखी कारण त्या बनवणाऱ्यालाही वाटते आपण असावे सुखी.

विविधता

भिन्न-भिन्न विभिन्न हा आणि तो ती आणि ही भिन्न-भिन्न विभिन्न Distance आणि Displacement Near आणि Far भिन्न-भिन्न विभिन्न तुम्ही आणि तू अहो आणि अग भिन्न-भिन्न विभिन्न निसर्ग आणि कृत्रिम आहे आणि होता भिन्न-भिन्न विभिन्न

पहिली सर

जी रुसलेल्यांना खुलण्याचा मार्ग देते. जी सुकलेल्या झाडांना खुलवून हरित करते. जी कोकिळेला गाणं म्हणवण्याचं कारण ठरते. जी रस्ता स्वच्छ करून थुंकणार्यांना अहिंसक उत्तर देते. जी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनीला जगवते.

मैत्री तुझी-माझी

मैत्री चे नाते सुंदर असते, बघता-बघता उमलून निघते. हारतो,खचतो,दुखावतो,रागावतो, पण या सगळ्यांचा डॉक्टर आपला मित्र/मैत्रिण असतो. स्वतःची स्वतःसोबत उत्तम मैत्री असावी,  पण त्या मैत्रीत थोडी दुसऱ्याचीही हरकत असावी. त्या देवाने मानवता मानवाला दिली असेल तर,  त्यात मैत्रीचा विचार नक्कीच त्याने केला असेल. अल्हादाई आहे हे नातं, कारण हे मिळवायला खरच नशीब लागत.